शुक्रवार, 21 अगस्त 2015

इतिहास : भारतात युरोपीय सत्तेचा उदय...

भारतामध्ये युरोपीय सत्तांचा उदय कसा झाला ? ह्या युरोपीय सत्ता भारतात कश्या प्रकारे अस्तित्वात आल्या ? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण घेण्याचे प्रयत्न करु.
   इसवी सनाच्या पंधराव्या शतकापर्यंत  युरोपीय देश पुर्वेकडील देशांसोबत पुर्वी व्यापार  कॉन्स्टॅटिनोपल (इस्तंबुल) या खुष्कीच्या मार्गाने  म्हणजेच भुमार्गाने होत असे. हे शहर बायझन्टाइन साम्राज्याची म्हणजेच पुर्वेकडील रोमन साम्राज्याची राजधानी होती. परंतु हे शहर ऑटोमन  तुर्कांनी (१४५३) जिंकल्यामुळे मार्गाअभावी  युरोपीय देशांचा पुर्वेकडील देशांसोबत होणारा व्यापार बंद पडला. त्यामुळे पुर्वेकडील देशांशी व्यापार करायचे असल्यास नवे मार्गांचा किंवा समुद्रमार्गाचा शोध घेणे युरोपीय देशांना आवश्यक झाला.  त्याचमुळे कोलबंस या  खलाश्याने स्पॅनिश राजा राणीच्या मदतीने अटलांटीक महासागर पार करुन भारताचा शोध घेत असताना तो एका किनार्या जवळ जाउन पोहचला. परंतु त्याला आपण भारतात आल्याचा गैरसमज झाला. याच मार्गाने पुढे इटालियन खलाशी अमेरिगो व्हेस्पुसी हा त्या किनार्यावर पोहचला. हा भारताचा किनारा नसल्याचे त्याच्या लक्षात आले. या माहीती नसलेल्या प्रदेशाला त्याने अमेरिका हे नाव दिले. त्यानंतर लगेच वास्को द गामा या पोर्तुगिज प्रवाश्याने दक्षिन आफ्रीकेच्या टोकाला वळसा घालुन भारताचा समुद्रमार्ग (१४९८) शोधत भारतातील कालिकत बंदरावर पहीले पाउल टाकले. तेथे नंतर ३८ अंगरक्षक घेऊन तो राजा झामोरिनच्या भेटीला गेला. त्याला पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी झाली होती. तीन तास त्याने राजाशी वाटाघाटी केल्या. व्यापारासाठी परवानगी मागितली परंतु तेथे अरब व्यापारी अगोदर पासुनच व्यापार करत त्यांचा विरोध होता. त्यामुळे वास्को द गामा ने दोन महीने राजाची मन धरणी केली व परवानगी मिळवली. तेव्हा झामोरिन राजाने त्याला १२ सुती कापडं, एक पोती साखर, ६ टोप्या, ४ प्रवाळांच्या माळा, ६ हातपुसणी, २ पिंप तेल आणि २ पिंपे मध दिला.या प्रकारे युरोपियांना भारतामध्ये व्यापार करण्याची परवानगी मिळवली.
              पोर्तुगिज या युरोपीय देशानंतर डच, इंग्रज, फ्रेंच हे देश हे  व्यापार करण्या करता भारतात आले. इंग्रजांनी आपली पहीली  वखार मुगल सम्राट जहांगिर यांच्या कारकिर्दीत स्थापन केली.त्यानंतर इंग्रजांनी आपल्या वखारी ह्या मच्छलीपट्टणम, सुरत, मद्रास व अश्या  अनेक ठिकाणी वखारी स्थापण केल्या. भारतातील व्यापार करत भरपुर नफा मिळवणे हा त्यांचा उद्देश होता.  परंतु व्यापार करत असताना इंग्रजांना डच , पोर्तुगिज आणि फ्रेंच यासारख्या कंपन्याकडुन स्पर्धा करावी लागत होती. यामध्ये पोर्तुगिज हे व्यापार बरोबरच धर्मप्रसार व राज्यविस्तार करु इच्छित असल्यामुळे त्याच्या सत्तेचा जास्त विस्तार होउ शकला नाही. याच सुमारास युरोपात इंग्लडने
हॉलंडचा पराभव केल्यामुळे भारतातील डच, व्यापारी निष्प्रभ झाले. फ्रेच व इंग्रज हे प्रतिस्पर्धी बनले परंतु कर्नाटकांच्या तीन युद्धात (पहिले कर्नाटक युध्द (१७४६-१७४८), दुसरे कर्नाटक युध्द (१७४८-१७५४),  तिसरे कर्नाटक युध्द (१७५६-१७६३) ) सरासरी इंग्रजांची सरशी ठरली. व कर्नाटकाच्या तिसर्या युद्धानंतर फ्रेंच हा पुर्णपणे  निष्प्रभ्र झाले.
            बंगालचा सुभेदार शहासुजा याने १६५१ वर्षी इग्रजांना बंगालमध्ये पहीली वखार स्थापन करण्याची परवानगी दिली. १७५६ ला बंगालचा नवाब हा सिराज उदौला बनला. इंग्रजांनी याच काळात फ्रेंच सोबत युद्ध होण्याची चिन्हे दिसत असल्या मुळे इंग्रजांनी दक्ष राहणे पसंद केले. इंग्रजांच्या हालाचाली बघुन सिराजउदौला यांने इंग्रजांना विचारणा केली परंतु इंग्रजांनी टाळाटाळीचे उत्तर दिल्यामुळे सिराज उदौला ने इंग्रजाविरुद्ध मोहीम उघडुन फोर्ट विलियम वर हल्ला चढविला. व इग्रजांनी या मोहीमेत शरणागती पत्करुन सिराजउदौला ने कलकत्ता जिंकुन मानिकचंदच्या ताब्यात दिला. परंतु सिराजउदौला राजधानी मुर्शिदाबाद ला जाताच क्लाईव यांच्या नेतृत्वात ईंग्रजांचे सैन्य हे कलकत्या वर चाल करुन आले. तेव्हा मानिकचंद ने लाच घेउन कलकत्ता शहर हे इंग्रजांच्या स्वाधिन केले. व यामुळे सिराजउदौला व इग्रज यांच्यात तह झाला.
            परंतु आता इंग्रज आणि बंगालचा नवाब सिराजउदौला यांच्यात धुसफुस चालुच होती. तर काही नवाबाचा सेनापती मीर जाफर  व अन्य अधिकारी नवाबावर नाराज होते. याचा फायदा घेत इंग्रजांनी मीर जाफरला नवाब पदाचे लालच दाखवत आपल्या बाजुने वळवुन घेतले होते. दरम्यान चंद्रनगर हे फ्रेंचाची वसाहत इंग्रजांनी जिंकुन घेतली. यामुळे नवाब हा सतप्त झाला. पण त्याला मराठा व अफगाण यांच्याकडुन आक्रमन होण्याची भिती वाटत होती. अश्यावेळी क्लाईव्ह हा आपल्या सैन्यासह मुर्शिदाबादवर चालकरण्यास निघाला. २३ जून १७५७ रोजी मुर्शिदाबादच्या दक्षिणेला २२ मैलांवर असलेल्या प्लासी गावात एकमेकांसमोर आले. सेनापती मीर जाफर ने नवाबला युद्धकार्य हे अधिकार्याच्या हातात  सोपवुन स्वता राजधानीला जाण्याचा सल्ला दिला. व त्याप्रमाने नवाबाने २००० सैन्य घेउन राजधानीला प्रस्थान केले. परंतु रणभुमीवर फ्रेंच सैन्य व नवाबाचे सैन्य लवकरच पराभुत होण्यास लागले. व मीर जाफर हा फक्त बघ्याची भुमिका घेत होता. त्यामुळे लवकरच नवाबाचे सैन्य पराभुत झाले. अश्या प्रकारे प्लासीच्या लढाईमध्ये जवळपास न लढताच नवाबाच्या सहकार्यांमार्फत त्याचा विश्वासघात करुन इंग्रजानी प्लासी ची लढाई जिंकली...
             या प्लासीच्या लढाईनंतर मीर जाफर बंगालचा नवाब बनला. या नवाबाने इंग्रज अधिकार्यांना अनेक बक्षिस दिल्यामुळे नवाबाचा खजिना रिकामा झाला. तसेच मीर जाफर हा इंग्रजांच्या हाता खालचे बाहुले बनले.  त्यामुळे नवाब च्या विरुद्ध भावना निर्मान होउ लागली. याच विरोधी भावनेचा फायदा घेत व अध्क द्रव्याच्या लोभा पायी मीर जाफरचा जावई मीर कासीम याला इग्रजांनी बंगालचा नवा नवाब बनवले. मीर कासीम व इंग्रजामध्ये तह झाला होता.. त्या तहा नुसार  मीर कासीमने कंपनीला बरद्वान, मिदनापूर व चितगाव जिल्हे द्यावे. सिल्हटच्या चुना व्यापारात कंपनीची अर्धी भागीदारी राहील. मीर कासीम कंपनीला दक्षिण मोहिमांसाठी रु. ५ लक्ष देईल. कंपनीचे शत्रुमित्र मीर कासीम आपले शत्रुमित्र मानील. एकमेकांच्या प्रदेशातील लोकांना रहिवासाची संमती देण्यात येणार नाही.कंपनी मीर कासीमला लष्करी मदत देईल. परंतु अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप करणार नाही. परंतु इंग्रजांच्या वृत्ती मुळे मीर कासीम यालाही इंग्रजा सोबत संघर्ष करावा लागला आणि प्रत्यक्षात त्याने १७६३ इंग्रजाविरुद्ध बंड पुकारला. त्यामुळे पुन्हा बंगाल नवाब म्हणुन मीर जाफर ला बनविण्यात आले.
यामुळे मीर कासीम ची ताकद कमी पडायला
लागली.
             मीर कासीम हा सिमेवरील अवध राज्यात निघुन  गेला. ह्यावेळीअवधाचा नबाब शुजा उद्दौला होता. पानिपतच्या युद्धाच्या वेळी दिल्लीहून पळालेला मुगल सम्राट शाह आलम अवधच्याच आश्रयाला होता. या तिघांनी संगन मत करुन त्यांनी इंग्रजांची हाकलुन लावण्यासाठी एक स्वतंत्र फळी निर्माण करण्यात आली. त्यानुसार त्यांच्या जवळ ५०००० सैनिक होते. ह्या सैन्याचा मुकाबला कंपनीबरोबर बक्सार येथे झाला. इंग्रज सैन्यात ७०२७ सैनिक असून त्याचे नेतृत्व मेजर मनरोकडे होते.यामध्ये लढाईमध्ये इंग्रजांचा विजय झाला व  इंग्रजांना भारतामध्ये सशक्त लढा देणारी कोणीही शिल्लक राहले नव्हते.  बक्सारचे युद्ध जिंकल्यामुळे इंग्रज भारतात हे शक्तशाली झाले होते.

संजय कोकरे
Www.misionupsc.blogspot.com
                           

(संदर्भ : इंटरनेट वरील अनेक लेख...)

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

COMBINED DEFENCE SERVICES EXAMINATION (II), 2018 [INCLUDING SSC WOMEN (NON-TECHNICAL) COURSE] (Commission’s Website www.upsc.gov.in)

EXAMINATION NOTICE NO.11/2018.CDS-II DATED 08.08.2018 (Last Date for Submission of Applications: 03.09.2018)  COMBINED DEFENCE SERVI...