शनिवार, 22 अगस्त 2015

यूपीएससी/एमपीएससीचे अभ्यास धोरण

यूपीएससी / एमपीएससी या स्पर्धात्मक परीक्षा असल्याने तसेच त्या अनेक कारणांमुळे इतर परीक्षांपेक्षा वेगळ्या असल्याने या परीक्षांची तयारी करण्यासाठी विशेष अभ्यास पद्धतीचा स्वीकार करणे अत्यावश्यक ठरते. त्यादृष्टीने पुढील पाय-या महत्त्वपूर्ण मानल्या पाहिजेत.
एक म्हणजे विद्यार्थ्याने प्रारंभीच या परीक्षेचे स्वरूप सविस्तरपणे लक्षात घ्यावे. दुसरे म्हणजे यातील पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षेतील सर्व पेपर्सचा अभ्यासक्रम बारकाईने पाहावा. किंबहुना हा अभ्यासक्रम सतत नजरेसमोर असला पाहिजे. त्यानंतर आयोगाच्या मागील किमान 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे पद्धतशीर विश्लेषण करावे. त्या आधारे प्रश्नाचे स्वरूप, त्यात होणारे बदल लक्षात घेऊन तयारी करावी. अभ्यास पद्धतीतील चौथा टप्पा म्हणजे प्रत्येक विषयासाठी वाचायच्या संदभर् पुस्तकांची यादी मिळवावी. कोणत्या विषयासाठी काय वाचायचे आहे याची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. त्यानंतर अभ्यास व वेळेचे नियोजन करावे.
स्पर्धा परीक्षांच्या तयारीत अभ्यास व वेळेचे नियोजन व त्याची अंमलबजावणी मध्यवर्ती ठरते. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवावे की, मुख्य परीक्षेसाठी किमान 7 महिने, तर पूर्व परीक्षेसाठी 5 महिन्यांचा कालावधी आवश्यक ठरतो. त्याचप्रमाणे तयारीतील एकूण वेळेपैकी 60% वेळ वैकल्पिक विषयांसाठी आणि 40% वेळ सामान्य अध्ययनासाठी निर्धारित करावा. त्याचबरोबर उजळणीचेही वेळापत्रक निर्धारित करावे. उजळणीद्वारे आपली तयारी मजबूत करता येते.
या परीक्षांची तयारी करताना आकलन व विश्लेषणाची क्षमता विकसित करण्यावर भर द्यावा. महत्त्वाचे म्हणजे पूर्व परीक्षेच्या संदर्भात वस्तुनिष्ठ प्रश्नांचा भरपूर सराव करावा आणि मुख्य परीक्षेसाठी लेखनाचा सातत्याने सराव करावा. मुख्य परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी केवळ वाचन व उजळणीवरच अतिरिक्त भर देतात. परिणामी लेखनाच्या सरावाकडे त्यांचे दुर्लक्ष होते. ही चूक टाळण्यासाठी सुरुवातीपासूनच प्रश्नोत्तराचा सरावा करावा. यासंदर्भात नियमित सराव चाचण्या देऊन आपल्या चुका शोधून त्या दुरुस्त करण्यावर भर द्यावा. भरपूर सरावाद्वारेच आपली लेखनशैली व अभिव्यक्ती प्रभावी करता येते.
मुलाखतीची तयारी करताना आपल्या व्यक्तिगत माहितीपासून ते अभ्यासबाह्य रस, छंद या घटकांची तयारी महत्त्वाची ठरते. मुलाखतीतील सर्व घटकांची तयारी करून अधिकाधिक ‘मॉक इंटरव्ह्यूज’ द्यावेत. अधिकाधिक मॉक देऊन संवादकौशल्य सुधारावे. आपली भाषा, देहबोली आणि उत्तराचा नेमकेपणा या सर्वच घटकांबाबत विचारपूर्वक सुधारणा करता येतात.
अशा रीतीने या परीक्षेतील पूर्व, मुख्य व मुलाखत या तिन्ही टप्प्यांचा स्वरूपानुरूप अभ्यास करावा. प्रत्येक टप्प्यासाठी योग्य वेळ द्यावा. परीक्षेनुरूप प्रश्नांचा भरपूर सराव व्हावा यासाठी सातत्याने सराव चाचण्यांवर भर द्यावा. थोडक्यात, प्रभावी नियोजन व त्याची कार्यक्षम अंमलबजावणी आणि सातत्यपूर्ण व योग्य दिशेने अभ्यास केल्यास यात यश निश्चित आहे.

तुकाराम जाधव, संचालक, द युनिक अकॅडमी |
Dec 11, 2013, 07:20:00 AM IST

Source:  m.divyamarathi.bhaskar.com/news-rlt/referer/5483/MAG-tukaram-jadhavs-artical-on-upscmpsc-4460668-NOR.html?referrer_url=

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

COMBINED DEFENCE SERVICES EXAMINATION (II), 2018 [INCLUDING SSC WOMEN (NON-TECHNICAL) COURSE] (Commission’s Website www.upsc.gov.in)

EXAMINATION NOTICE NO.11/2018.CDS-II DATED 08.08.2018 (Last Date for Submission of Applications: 03.09.2018)  COMBINED DEFENCE SERVI...